ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास देणार मानवंदना
पुणे : उद्या 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे मानवंदना देणार आहेत. सकाळी 11 वाजता मंत्री राऊत येणार आहेत. त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजेश लिलोठिया यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास दरवर्षी 1 जानेवारी रोजी राज्यासह देशभरातून नागरिक मानवंदना देण्यासाठी येत असतात. आपल्या शूर विरांच्या पराक्रमाचे स्मरण त्या निमित्ताने केले जाते. या ठिकाणी अनेक मान्यवर देखील उपस्थित राहतात. त्यानुसार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत देखील उपस्थित राहून मानवंदना देणार आहेत.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सोबत पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, संग्राम थोपटे, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज बागडी, प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ हतिअंभिरे, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कैलास कदम, उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस सचिव गौतम आरकडे यांनी दिली आहे.
