Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतून दोन जणांना अटक

मुंबई : TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आज दिल्ली येथून आणखी दोन जणांना अटक केलीआहे. आशुतोष शर्मा आणि रोहिणी अवंतिका अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या निशीद गायकवाड यांनी शर्मा यांनी पेपर पुरविल्याची माहिती दिल्यानंतर या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आलीआहे. यासाठी पुणे पोलिसांचे पथक गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते.

दरम्यान, आरोग्य भरतीच्या पेपरपासून राज्यात पेपर फुटीचे सत्र सुरू झाले आहे. आधी आरोग्य भरतीच्या पेपर नंतर म्हाडाचा नोकर भरतीचा पेपर अन् त्याचा तपास सुरू असताना TET अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले.  मागील महिन्यात 21 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली होती. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून आज दिल्लीतून दोन जणांना अटक करण्यात करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading