अजित पवार यांनी अधिवेशनात कोणते प्रश्न मार्गी लावले? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
पुणे: विधानसभा अधिवेशनात सरकार कोणते प्रश्न मार्गी लावते. याची विरोधकांसह सामान्य जनतेला उत्सुकता असते. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा अधिवेशन मध्ये अजित पवार फक्त कोरोना बद्दल बोलले यावर. भाजपचे चे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना
विधानसभा अधिवेशनात कोणते प्रश्न मार्गी लावले असा सवाल पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज विविध मुद्यांवर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनापूर्वी एसटी कामगारांचेविलीनीकरण शक्य नाही . असे म्हटले होते. त्यावर राज्य सरकारने एसटी कामगारांना दम दिला का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
विधानसभा अध्यक्ष ठरण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राज्यपालांना सारखे भेटत आहेत त्यावर चंद्रकांत पाटील म राज्यपालांना दबाव नाही. दम दिला गेला .राज्यपालांना काय करायचंय ते त्यांना ठरवू द्या. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन, महा विकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्ष व्हायला पाहिजे. असे म्हणत आहेत .त्यावर पाटील म्हणाले,संजय राऊत तुमचे दोन वर्षात स्टार चांगले आहेत .त्यामुळे काही बोललं की माध्यमं दखल घेताय.मात्र घराघरात राऊतांची चेष्टा केली जातीये अशी टीका पाटील यांनी राऊत यांच्या वर केली .
मात्र घराघरात राऊतांची चेष्टा केली जातीये
नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी खून केल्यामुळे नारायण राणे यांचा या प्रकरणात हात असल्यामुळे नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे त्यावर पाटील म्हणाले,आम्ही घाबरत नाहीत राणे तर बिल्कुल घाबरत नाहीत. असे पाटील म्हणाले.
