Pune rickshaw strike – पुण्यातील रिक्षा संघटनांचा ‘या’कारणांमुळे बेमुदत संप
पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एका रिक्षाचालकाच्या पत्नीवर रात्री एक वाजता फायनान्स कंपनीच्या लोकांनी विनयभंग केला. दखल घ्यावी म्हणून प्रयत्न करूनदेखील तेथील पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही.त्याचं विविध मागण्यांसाठी बरोबर रिक्षा संघटनां आजपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करणार आहेत. या कालावधीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा बंद राहणार असल्याची माहिती ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ केशव नाना क्षीरसागर यांनी दिली.
शहरात फायनन्स कंपन्याची गुंडगिरी वाढत असून या लोकांनी रिक्षाचालकाच्या पत्नीचा विनयभंग केला मात्र त्याची पोलिस दखल घेत नसल्याचा आरोप करत संघटनेने डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली 4 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषनाला बसले आहे. मात्र, प्रशासन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बीजेपी रिक्षा आघाडी, सावकाश रिक्षा संघटना, आम आदमी रिक्षा संघटना व इतर काही संघटनांनी पाठिंबा दिला असून दोन्ही शहरांतील रिक्षाचालक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करणार आहेत, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ केशव नाना क्षीरसागर म्हणाले, “रिक्षाचालकाचा पत्नी व रात्री एक वाजता घरी येऊन फायनान्स कंपनीच्या गुंडांनी विनयभंग केला.याची दखल घ्यावी यासाठी गेले एक महिना आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र तरीदेखील पोलीस याकडे लक्ष देत नाहीत. त्याचबरोबर बेकायदा बाईक, टॅक्सी बंद करण्यासाठी वारंवार मागण्या करून देखील त्या बंद झाल्या नाहीत. याचा निषेध करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून उपोषणाला बसलो आहोत. तरी देखील प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही.” जिल्हाधिकारी म्हणतात, “माझ्या हातात काहीच नाही मी सगळं पुढे पाठवत आहे” विनयभंग सारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये, पण इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून देखील लक्ष दिले जात नसेल तर याचा अर्थ असा होतो की, “सरकारची फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याची इच्छाच नाही.म्हणून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत अशी माहिती डॉक्टर शिरसागर यांनी दिली.
