Friday, May 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

मराठी चित्रपट सृष्टीत प्रथमच ऑडिशनमधील विजेत्या कलाकारांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव

पुणे: नवोदित कलाकारांना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी रा फिल्म्स आणि निर्माते संदीप मधुकर बधे यांच्या तर्फे नुकतेच नवीन चित्रपटासाठी ऑडीशन तसेच कलाकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच विजेत्या कलाकारांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलें. तसेच यातून कलाकारांना रा फिल्मच्या आगामी काळात येणाऱ्या चित्रपटासाठी देखील निवड करण्यात येईल अशी ग्वाही रा फिल्म्सच्या निर्मात्या राणी टोणगे आणि दिग्दर्शक प्रदीप टोणगे यांनी दिली.

या कार्यक्रमाला नगर,नाशिक,औरंगाबाद,सातारा,सांगली,मुंबई,पुणे अशा विविध शहरांमधून साधारण २५०-३०० कलाकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे या देखील उपस्थित होत्या.
या सोहळ्याचे संपूर्ण आयोजन संदीप मधुकर बधे व रा फिल्म्स या निर्मिती संस्थेने केले होते. राणी टोणगे, दिनेश किरवे, गणेश शिंदे, सुजित जाधव यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी संदीप बधे, कोंढवा मधील संदीप नाना मारुती बधे, सिनेअभिनेत्री अमृता धोंगडे, बळीशेठ निंबाळकर, शिवभक्त सचिन गवळी, आदित्य राजे मराठे, अशोकभाऊ एकतपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित कलाकारांनी रा फिल्म्स च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading