Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

कोविडमुक्त भारतासाठी भारत सरकार आणि जिविका हेल्‍थकेअरच्या सहयोगातून व्‍हॅक्सिनऑनव्हील्‍स उपक्रम

पुणे : ओमिक्रॉनच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे देशाचे कोविड-१९च्‍या भावी घातक प्रादुर्भावापासून सुरक्षित करण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे लसीकरण हा आहे  .भारताच्‍या भौगोलिकदृष्‍ट्या पोहोचण्‍यास अवघड जाणा-या ग्रामीण व शहरी भागांमधील लोकांपर्यंत लसीकरण मोहिमेच्‍या माध्‍यमातून पोहोचण्‍याच्या उद्दिष्टाने भारत सरकार आणि  जिविका हेल्‍थकेअर ग्रुपचा भाग व्‍हॅक्सिनऑनव्‍हील्‍स च्या सहयोगातून मोबाइल व्‍हॅक्सिनेशन क्लिनिक्‍स हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे

व्‍हॅक्सिनऑनव्‍हील्‍स  असलेले मोबाइल व्‍हॅक्सिनेशन क्लिनिक्‍सच्या माध्यमातून   लसीकरण सुलभ  पदधतीने केले जाते . पंतप्रधान मोदी यांनी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, तसेच १० जानेवारी २०२२ पासून कोमोबिर्डीटीज असलेल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्‍याची घोषणा केली.भारतातील पहिल्या डॉक्‍टर मोबाइल व्‍हॅक्सिनेशन क्लिनिक असलेल्‍या जिविका हेल्‍थकेअर ग्रुपचा भाग व्‍हॅक्सिनऑनव्‍हील्‍स कार्यरत असलेल्‍या सर्व शहरांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील  व्‍हॅक्सिनऑनव्हील्‍स तरूणांचे लसीकरण करण्‍यासोबत ज्‍येष्‍ठ नागरिक व फ्रण्‍टलाइन कर्मचा-यांना बूस्‍टर डोसेस देण्‍यास सुरूवात करणार आहे.

 

महाराष्‍ट्र, तेलंगणा व कर्नाटक येथे कार्यरत असलेले व्‍हॅक्सिनऑनव्हील्‍सने आपल्‍या १०० हून अधिक मोबाइल क्लिनिक्‍ससह एप्रिल २०२१ पासून अर्ध दशलक्षहून अधिक कोविड-१९ लसीकरण केले आहे. कंपनी झारखंड व तामिळनाडूमध्‍ये आपली पोहोच वाढवण्‍याच्‍या मार्गावर आहे, जेथे जानेवारी २०२२ पर्यंत ५० हून अधिक युनिट्सची भर करण्‍यात येणार आहे. यामुळे एकूण कार्यरत युनिट्सची संख्‍या १५० हून अधिकपर्यंत पोहोचेल आणि दिवसाला २५००० हून अधिक डोसेस देण्‍याची क्षमता असेल. सध्‍या १०० हून अधिक डॉक्‍टर असलेल्या मोबाइल व्‍हॅक्सिनेशन क्लिनिक्‍ससह भारताला सेवा देण्‍यासोबत महाराष्‍ट्रामध्‍ये ५० हून अधिक युनिट्स, ज्‍यापैकी पुण्‍यामध्‍ये २४ युनिट्स आहेत

व्‍हॅक्सिनऑनव्हील्‍सचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिग्‍नेश पटेल म्‍हणाले की व्‍हॅक्सिनऑनव्हील्‍स नवोन्‍मेष्‍कारी, समुदाय-केंद्रित दृष्टीकोनाचे उदाहरण आहे आणि देशाच्‍या निरंतन कोविड-१९ लसीकरण प्रयत्‍नांना साह्य करण्‍यासाठी ग्रामीण व वंचित लोकांपर्यंत पोहोच वाढवण्‍याचा प्रयत्‍न करत आली आहे. यामुळे कोविड-१९ लस घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी, विशेषत: ग्रामीण व वंचित लोकांसाठी कोणतेही व सर्व अडथळे दूर होण्‍याची खात्री मिळेल. आम्‍ही अर्ध दशलक्ष लसीकरण केले आहे आणि मार्च २०२२ पर्यंत ३ दशलक्ष लोकांचे लसीकरण करण्‍याचे लक्ष्‍य गाठण्‍यासाठी दररोज २५,००० लसीकरण करण्‍याचा आमचा मनसुबा आहे. आमचे प्रयत्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रत्‍येक नागरिकाचे वेळेवर लसीकरण करण्‍यात येण्‍यासंदर्भातील दृष्टीकोनाशी संलग्‍न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading