टाटा – सीमेन्स जेव्ही PPP अंतर्गत पुणे मेट्रोसाठी मेट्रो कॉरिडॉर विकसित करणार
पुणे : पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप रूट (पीपीपी) अंतर्गत टीआयआरएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टाटा ग्रुप कंपनी) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच (सीमेन्स वित्तीय सेवा ची उपकंपनी) यांच्यातील संयुक्त उपक्रम हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉर विकसित करेल. या संयुक्त उपक्रमाने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड नावाची विशेष उद्देश कंपनी स्थापन केली आहे. उन्नत मेट्रो मार्ग हिंजेवाडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क ते बालेवाडी मार्गे शिवाजीनगरला जोडतो. 23 स्टेशन्स असलेला 23.3 किलोमीटरचा कॉरिडॉर हा नवीन मेट्रो रेल्वे धोरणाअंतर्गत भारतातील पहिला मेट्रो प्रकल्प असेल.
सीमेन्स एजी, सीमेन्स मोबिलिटी जीएमबीएच( GmbH), सीमेन्स लिमिटेड आणि अल्स्टोम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड यांच्या एकत्रित संघाला पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड द्वारे प्रकल्पाच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सिस्टिम कामासाठी कंत्राट देण्यात आले आहे. हा प्रकल्प ३९ महिन्यांत पूर्ण होणार आहे. सीमेन्स लिमिटेड या संघाचा एक भाग असल्याने या प्रतिष्ठित प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन, टर्नकी विद्युतीकरण, सिग्नलिंग, कम्युनिकेशन्स आणि डेपो कामे (उपकरणे) प्रदान करेल. सीमेन्स लिमिटेडच्या ऑर्डर चे आकारमान रु.900 कोटी (अंदाजे)..च्या मर्यादेपर्यंत आहे.
सीमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर म्हणाले, “आम्हाला हा प्रकल्प दिल्याबद्दल आम्ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आभार मानू इच्छितो. जागतिक स्तरावर अत्याधुनिक मेट्रो रेल्वे साठी उपाय प्रदान करण्यात सीमेन्स आघाडीवर आहे. पुणे मेट्रो हा एक प्रतिष्ठित प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प संयुक्तपणे विकसित करण्यासाठी टाटासोबत भागीदारी करताना सीमेन्सला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की नवीन मेट्रो लाईन पुणेकर नागरिकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम करून त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
सीमेन्स वित्तीय सेवा (SFS) जगभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करते. सार्वजनिक खाजगी भागीदारी( PPPs )द्वारे, सीमेन्स वित्तीय सेवा (SFS) शहरांना बुद्धीमान पायाभूत सुविधा मिळवण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आणि अधिक स्मार्ट, अधिक टिकाऊ वाहतूक नेटवर्क सक्षम करण्यास मदत करते.
