Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत अभाविपने घेतली राज्यपालांची भेट

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत काल पुण्यात राज भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अभाविप पुणे महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गोस्वामी सर , अभाविपचे महानगर संघटन मंत्री अमोल देशपांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉक्टर शरद गोसावी म्हणाले,राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणाम झाले आहेत. आम्हाला राज्यपाल पुण्यात आहे असे कळले त्यामुळे आम्ही राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन दिले आहे. राज्यपालां बरोबर बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामा बद्दल आम्ही चर्चा केली, असेही शरद गोसावी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading