ST workers strike: : दोन पावलं सर्वांनीच मागे येऊन प्रकरण मिटवायला हवे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरण प्रश्न अजून मिटला नाही. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाचा प्रश्न सोडून द्या. असे म्हटले होते. त्यावर एसटी ही गोरगरिबांची वाहिनी आहे. हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये. सर्वांनी समजंसपणाची भूमिका घ्यायला हवी. दोन पावलं सर्वांनीच मागे येऊन प्रकरण मिटवायला हवे असे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुण्याचे पालकमंत्री त्यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांना या बाबत माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत सरकारने सांगितलेले नियम सर्वांनी पाळावेत. आता इथं काही पत्रकारांनी मास्क काढलेत. हे मी बोलणार नव्हतो. पण नियम सर्वांसाठी आहेत. ओमयक्रॉनचा धोका पाहून त्याचं तंतोतंत पालन करावं आणि तसं वागावं असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने भूमिका घ्यावी. लोकांमध्ये जनजागृती करावी. सगळे नियम पाळतील अशा बातम्या द्याव्यात. अजून निष्काळजीपणा दिसतोय, तो दूर व्हायला हवा असे ते म्हणाले. अनेकजण दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतात, त्यांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी करायला हवी. थोडं तारतम्य बाळगायला हवे असे अजित पवार म्हणाले. 12 आमदार निलंबीत केलेला विषय हा सभागृहाचा आहे. याबाबतीत सभागृहात बोलावं लागतं.बाहेर याबाबत जास्त बोलता येत नाही असे पवार म्हणाले.
पेपरफुटी प्रकरणावर अजित पवार म्हणाले, पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असं पुन्हा घडू नये.
यात राजकारण आणू नये असे अजित पवार म्हणाले. सीबीआयला भरपूर कामं आहेत. पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. याआधीही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली आहेत. सुशांत सिंग प्रकरणात काय झालं, शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू असेही ते म्हणाले.
