Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

सोनालिकातर्फे फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर बाजारात दाखल

पुणे : किसान दिवसाच्या निमित्ताने  सोनालिका ट्रॅक्टर्सने सीआरडीएस (कॉमन रेल डिझेल सिस्टम)  या तंत्रज्ञानासह सर्वात प्रगत टायगर डीआय ७५  फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर   लॉन्च केला आहे. ११ ते ११. २  लाख रुपये अशी या ट्रॅकरची प्रास्ताविक किंमत आहे. योग्य किंमत आणि मजबूत ऊर्जा पुरवणारा ट्रॅक्टर असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. सीआरडी तंत्रज्ञानासह टायगर ७५ फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर हा भारत फोर आयव्ही  उत्सर्जन मानदंडांचे पालन करतो. फक्त एक  बटण दाबल्यानंतर हा ट्रॅक्टर ७५  एचपी आणि ६५ एचपीची ऊर्जा निर्माण करतो. यासोबतच, सोनालिकाने टायगर डीआय ६५ फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर देखील सादर केला आहे जो ६५ एचपी पॉवर आणि ५५ एचपी ऊर्जा निर्माण करतो.

देशातील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक आणि देशातील पहिल्या क्रमांकाचा निर्यात करणारा ब्रँड असलेल्या  सोनालिका ट्रॅक्टर्सने युरोपमध्ये ट्रॅक्टरची टायगर रेंज डिझाईन केली आहे. २०१९ मध्ये लाँच झालेल्या या रेंजने सर्व क्षेत्रांतील शेतकऱ्यांची मने जिंकली दोन्ही नवीन मॉडेल्स आता बाजारात उपलब्ध असतील. ४ डब्ल्यूडी  आणि २ डब्ल्यूडी  असे दोन मॉडेल आणि १२+१२ शटल टेक ट्रान्समिशन आणि ५ जी हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम यासारखे प्रीमियम तंत्रज्ञान या ट्रॅक्टरमध्ये वापरण्यात आले आहे. बुद्धिमान वैशिष्ट्यांसह तयार केलेले सीआरडीएस ट्रॅक्टर पुढील पिढीच्या ग्राहकांसाठी कृषी यांत्रिकीकरण वाढीस चालना देतील.

टायगर डीआय ७५ आणि टायगर डीआय ६५ हे दोन्ही ट्रॅक्टर ‘स्काय स्मार्ट’ टेलिमॅटिक्स यंत्रणा असलेले ट्रॅक्टर आहेत. या तंत्रज्ञानामुळे इंजिन इमोबिलायझर, कमी झालेल्या ब्रेकडाउन वेळेसाठी रिअल-टाइम सपोर्ट, व्हेईकल जिओ-फेन्सिंग आणि इतरांसोबत ट्रॅकिंग यासारखी अद्वितीय वैशिष्ट्ये प्रत्यक्षात उतरतात. शेतकऱ्यांचे मौल्यवान अभिप्राय, सोनालिकाची संशोधन यंत्रणा आणि विकास तज्ञांनी परवडणाऱ्या शेतीसाठी १० टक्क्यांपर्यंत उच्च इंधन कार्यक्षमता देण्यासाठी सीआरडीएस तंत्रज्ञान विकसित केले आहे. भविष्यात ट्रेम स्टेज आयव्ही  उत्सर्जन मानदंडांचे पालन करण्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्सना देखील पाठिंबा देतील.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे  कार्यकारी संचालक  रमण मित्तल  म्हणाले  की देशाला प्रगतीच्या देशाने देण्यासह स्वतःच्या प्रगतीसाठी आमचे शेतकरी दररोज  प्रयत्न करत आहेत. किसान दिनानिमित्त आम्ही शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम सीआरडीएस असलेले आमचे सर्वात प्रगत टायगर डीआय ७५  ४ डब्ल्यूडी  ट्रॅक्टर लाँच करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading