कर्नाटक मधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
पुणे : कर्नाटक येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी राज्यात पडसाद उमटले .विविध पक्षा कडून यांचा निषेध करण्यात आला .याचा निषेध आज काँग्रेस पक्षा कडून पण करण्यात आला .
हा निषेध पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोळीबार मैदान, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे करण्यात आला.
या निषेध आंदोलनाचे येथील पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
या निषेध आंदोलनाला ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे ,अरविंद शिंदे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सोनाली मारणे ,अजित दरेकर ,संगीता तिवारी , प्रशांत सुरसे ,मुक्तार शेख, रवींद्र धंगेकर, माजी महापौर रजनी त्रिभुवन, विनोद मथुरावाला, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे शहर काँग्रेस ओबीसी अध्यक्ष सुनील पंडित व काँग्रेसचे पदाधिकारी, व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले,कर्नाटक येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन ज्या नराधमांनी केले . कर्नाटकात भाजप सरकार आहे त्यांनी ते शोधले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व पुण्यतिथी ची वाट बघत असतो. आपल्या राज्यात जर असा प्रकार घडला असता तर इथल्या तरुणांनी त्यांना झोडून मारले असते. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत असे उल्हास पवार म्हणाले.
रमेश बागवे म्हणाले, या भाजप सरकारचा निषेध केला पाहिजे. कर्नाटकामध्ये भाजपचे सरकार आहे.
या भाजप सरकारने खरंतर जे अनुचित प्रकार घडत आहेत. ते थांबवले पाहिजे.कर्नाटक येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन
केलेल्या नराधमांना त्यांनी लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे होते व त्यांना मोठी शिक्षा करायला पाहिजे होती. पण ते केले नाही म्हणून आज आम्ही आहे आंदोलन करत आहोत .असे रमेश बागवे म्हणाले.
