Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

महिला उद्योजकांच्या हस्ते झाले भीमथडीचे उदघाटन

पुणे : एग्रीकल्चर डेव्हलपमेंट Development ट्रस्ट बारामती व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यंदाच्या 15 व्या भीमथडीचे सध्या पद्धतीने आज उदघाटन झाले.

भीमथडीच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या आणि स्वतः सह इतरांना रोजगार देणाऱ्या या 15 जिल्ह्यातील महिला उद्योजिका
मनीषा भिरुड- जळगाव, अश्विनी कांबळे – मुंबई
शीतल पिसाळ -सातारा, सीमाताई यादव – पुणे, सुरेखा देवकर – सोलापूर, स्वप्नाली पाटील – सांगली
सुवर्णा देशमुख – कोल्हापूर, विजया पवार- बीड, कोमल काळे – मालवण, दीपिका देशमुख – अकोला, अंबिका शिंदे, वंदना चौधरी ,शारदा बच्छाव व मालन खोडवे- कर्जत जिल्हा अहमदनगर, कुंदा गुळवे – जामखेड जिल्हा अहमदनगर.
या उदघाटन प्रसंगी सुनेत्रा पवार, रजनी इंदुलकर, . लीना देशपांडे , सरोज पाटील, मीना जगधने, निकोला पवार . राजेंद्र दादा, सुमती पवार, सारस्वत बँक प्रतिनिधी वृषाली दिवाडकर, महाराष्ट्र बँक प्रतिनिधी . संतोष गदादे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषयक शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही जत्रा सुरू झाली आहे. अत्यंत सुबक मांडणी, स्वच्छता व नीटनेटकेपणा अशी वैशिष्ट्य असलेली भीमथडी जत्रा *समृद्ध ग्रामीण विकास ही थीम पुणेकरांसाठी घेऊन आली आहे.

व्हर्टीकल गार्डन, बिनमतीची शेती, सेंद्रीय उत्पादने याच बरोबर गाव तिथे देवराई हे या भीमथडीचे वेगळे पण आहे. या देवराईत एकूण 515 झाडे असून त्यात 96 प्रकारची देशी झाडे, 13 वेलवर्गीय झाडे, 11 प्रकारची झुडपे व 2 प्रकारची गवत आहेत. याच बरोबर लुप्त होत चाललेल्या लोककला, वाघ्या मुरळी, नंदिवाला आदी विविध अंगाने नटलेली ही भीमथडी पुणेकरांच्या पसंतीस उतरेल असा आयोजकांना विश्वास आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत कोरोनाचे नियम पाळून ही जत्रा दिनांक 26 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

Leave a Reply