fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

आगामी हिवाळी अधिवेशनात ‘शक्ती कायदा’ अंमलात आणण्यासठी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे 

पुणेः- स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांद्वारे एकमेकांवर होणा-या अन्यायाला आळा घालण्यासाठी तसेच आरोपीच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा अंमलात आणण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
डिजिटल टास्क फोर्स आणि ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर क्राईम हेल्पलाइन पुरस्कारांचे’ वितरण डॉ. नीलम गोऱ्हे  यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रोहन न्यायाधीश लिखित ‘द बेलफूल बर्थ ऑफ बिटकॉईन’  या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक अध्यक्ष रोहन न्यायाधीश, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, अॅड..नंदू फडके, पोलिस निरीक्षक ( सायबर सेल ) संजय तुंगार, किरण साळी, पुष्कर दुर्गे, धनंजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅम्बेसिडर्स आॅफ इंडियन सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेटर्स वर्गवारीतून डॉ. रश्मी करंदीकर, हितेश संघवी आणि पुष्पेंद्र सिंह यादव, ट्रेंड सेटर्स ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया या वर्गवारीतून रोहित जैन, चैतन्य भंडारी, बॅकबोन ऑफ इंडियन टेक्निकल अॅकॅडमिक्स वर्गवारीतून राहूल भारती आणि सुनील माने, टेक्नोलिगल पायोनियर्स ऑफ इंडिया वर्गवारीतून अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. अनुज मंत्री तर, फॉर्च्युन हंटर्स ऑफ डिजीटल इंडिया या वर्गवारीतून हर्षल पटेल आणि हेमंत चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे. ऑनलाईन कार्य पद्धतीमुळे एकीकडे महिला, ज्येष्ठ नागरिक, तरूण अशा सगळ्यांचीच फसवणूक होत असतांना याच इंटरनेटच्या सकारात्मक उपयोगामुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अस्तित्वात आली आणि रुजली. कोरोना काळात सर्व जग बंदिस्त झाले असतांना केवळ इंटरनेट या व्यासपीठामुळे जगण्याचे परिमाण बदलले. तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या प्रगतीमुळे एकीकडे मनुष्य प्राण्याचे जीवन सुसह्य होत असतांना ‘तो मी नव्हेच…’ चे रोजचे प्रयोग देखील पहायला मिळत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात कार्यरत असलेली कुसंघटीत टोळीचा बिमोड करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘महिलांची सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र झाले. त्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, अॅड..नंदू फडके आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला. यावेळी
मोबाईल हॅकिंग आणि सायबर क्षेत्राशी संबंधीत काही विषयांवरील प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
सूत्रसंचालन अनुप राऊत यांनी केले. अॅड.पुष्कर दुर्गे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading