Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वीजबिल सवलतीची आश्वासने देताना बुद्धीभ्रंश झाला होता का? – आप 

पुणे : आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे. यावर आम आदमी पक्षाने नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला असून वीजबिल सवलतीची आश्वासने देताना बुद्धीभ्रंश झाला होता का?, अशी टीका केली आहे.

तसेच केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून वीज बिल सवलत देत आहेत ह्यावरून जनतेनेच ओळखून घ्यावे, अशी टिपणीही आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. महामारीमुळे जनतेवर ही कर्ज काढून वीजबिल भरायची वेळ आली आहे दुसरीकडे सत्तेतील शिवसेनेने सवलतीचे आश्वासन वचननाम्यात दिले होते स्वतः राऊत यांनी दिवाळीत वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. तेव्हा या वस्तुस्थिती बाबत बुद्धीभ्रंश झाला होता का? असा हल्ला आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीवर केला आहे.

दिल्लीत केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून जनतेला ही वीजबिल सवलत देत आहेत हे यावरून जनतेने काय ते ओळखून घ्यावे अशी तिरकस टिपण्णी आप ने केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading