Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुणे मनपात तब्बल चार वर्ष बोगस अभियंता पदोन्नती घोटाळा झाल्याचा आपचा आरोप 

पुणे : काही दिवसांपूर्वीच बोगस अभियंता पदोन्नती घोटाळा आम आदमी पक्षाच्या वतीने उघडकीस करण्यात आला होता.  या घोटाळ्याचे धागे-दोरे महापौर कार्यालयापर्यंत आहेत, महापौरांचे सहाय्यक अनिल लोखंडे हे या प्रकरणात गुंतलेले आहेत याचाही उलगडा आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. या संदर्भात नुकतेच पालिकेत पोलीसही येवून गेले. मात्र हा घोटाळा एकदा नाही तर 2015, 2018, 2019 आणि 2021 यावर्षीही झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

या विषयी बोलताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ते अभिजीत मोरे म्हणाले, दरम्यान गेल्या एक आठवड्यात आम आदमी पक्षाच्या वतीने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आला. “पुणे महानगरपालिका सेवा सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम 2014” लागू झाल्यानंतर देखील अशा प्रकारच्या भरती, पदोन्नती प्रक्रियेतील घोटाळे मिटलेले नाहीत. आतापर्यंत वर्ष 2015, 2018, 2019 आणि यावर्षी 2021 साली झालेल्या पदोन्नती भरती प्रक्रियेत परराज्यातून बोगस अभियंता पदविका प्रमाणपत्र मिळवून तब्बल 42 मुन्नाभाई इंजिनीयर पुण्याचे रस्ते, पदपथ, पुल, उड्डाणपूल, ड्रेनेज लाईन आणि पुण्याच्या पायाभूत सुविधांवर अधिराज्य गाजवत आहेत. पण महापालिकेकडून अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप अभिजीत मोरे यांनी प्रशासनावर केला आहे.

आम आदमी पक्षाने जनतेसमोर जाहीर केलेली यादि

  • पुण्यातील रस्ते, पदपथ, पुल, उड्डाणपूल, ड्रेनेज लाईन, पायाभूत सुविधांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
  • महापौर व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत. पुणेकरांच्या भवितव्याशी, जीवाशी खेळण्याचा अधिकार त्यांना नाही !
  • पुणे मनपा सेवा नियम 2014 लागू केल्यानंतर देखील बोगस अभियंता पदोन्नतीची मनपात चार पीके !! तब्बल 42 मुन्नाभाई इंजिनीयर !!
  • इतर विभागात अजून किती बोगस कर्मचारी आहेत याची गिनतीच नसावी!
  • बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांकडूनच प्रमाणपत्र योग्य असल्याची शिफारस घेण्याचा पालिकेचा अजब फंडा !! चोरांकडूनच प्रामाणिकपणाचे पत्र घेण्याचा प्रकार..
  • पुरंदर तालुक्यात बोगस प्रमाणपत्र छापखाना ?

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading