Friday, June 5, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

‘रॉयल तष्ट’ फॅशन ब्रॅंडची सातासमुद्रापार झेप

  • आगामी वर्षात ‘R TASTA UK’ नावाने लंडनमध्ये ब्रँड

पुणे : फॅशन, संस्कृती आणि वारसा यांची उत्तम जाण असलेला ‘रॉयल तष्ट’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला फॅशन ब्रॅंड आता साता समुद्रांपार आपल्या कक्षा रुदावण्यास सज्ज झाला आहे. येत्या वर्षात लंडन येथे ‘रॉयल तष्ट’ या फॅशन ब्रॅंड सुरू होत असून; यामुळे पहिल्यांदाच एका मराठी माणसाने सुरू केलेल्या ब्रॅंडची पताका आता लंडनमध्ये फडकणार आहे.   

‘रॉयल तष्ट’चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार यांनी ही माहिती दिली.  ‘रॉयल तष्ट’ फॅशन ब्रॅंडने नुकतेच लंडन येथे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कंपनी ‘R TASTA UK’ या नावाने रजिस्टर केली असून आपले साम्राज्य उभे करण्याकडे पहिले पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय हस्तकला आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने लंडन येथे सुरू होणाऱ्या ‘रॉयल तष्ट’ च्या ब्रँड मध्ये आधुनिक टच दिलेले भारतीय पारंपारीक कपडे तसेच शिवकालीन संदर्भ घेवून तयार केलेले नवीन कलेक्शनही उपलब्ध असणार आहेत.  

या बद्दल अधिक माहिती देताना रॉयल तष्ट टीम, जवळपास चार वर्षांपूर्वी आम्ही लंडन दौऱ्यावर गेलो होते. तेव्हाच ठरवले होते की, आपल्याला लंडनमध्ये ब्रँड सुरू करायचे आहे. तब्बल चार वर्ष उराशी बाळगलेले हे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. लंडन येथे ब्रँड सुरू करण्याची सर्व तयारी झाली असून येत्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये या ब्रँड चे उदघाटन केले जाणार आहे. साता समुद्रापार आम्ही एका मराठी माणसाने तयार केलेला ब्रॅंड घेवून चाललो आहोत. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकल्या सारखा आनंद आम्हाला होता आहे.आणि ब्रँड चे लवकरच फोटो पाहायला मिळतील.तसेच ‘रॉयल तष्ट’ ब्रँड ची वाटचाल पाहून सोशल मीडियावर बऱ्याच कलाकारांसोबत पोस्टर व्हायरल होताना दिसत आहे.

संस्कृतीचा हात धरून फॅशन जगात नावाजलेला ‘रॉयल तष्ट’ हा एक फॅशन ब्रँड आहे. फॅशन आणि ऐतिहासिक संस्कृतीमध्ये समतोल राखत पुण्यातील ‘रॉयल तष्ट’ हा पुढे वाटचाल करीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading