भारत-पाक युध्दाच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त कर्नल(नि) संभाजी पाटील यांचा कर्तव्य फाउंडेशनतर्फे सत्कार
पुणे : बांगलादेश मुक्तिसंग्राम १९७१ च्या भारत-पाकीस्तान युध्दाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युध्दात सक्रिय सहभाग घेणारे निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांना कर्तव्य फाउंडेशनतर्फे सन्मानपत्र ,पुणेरी पगडी व तिरंगी मफलर देऊन सन्मानित करण्यात आले,कॅम्प हायस्कूल येथील कार्यक्रमात कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.यावेळेस माजी नगरसेवक दिलीप गिरमकर, प्राचार्या दुर्गा देशमुख, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे ,कार्याध्यक्ष अशोक देशमुख,शाम साहनी उपस्थित होते.
यावेळेस कर्नल संभाजी पाटील यांनी १९७१ च्या भारत-पाक युध्दात २२ मराठा लाईट इंन्फ्रंट्रीच्या माध्यमातून तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या युध्दभूमीवर आलेले अनुभव व भारतीय सैन्य दलातर्फे कसा विजय मिळविला याचे कथन केले.वालचंद संचेती, अशोक कदम व दिलीप गिरमकर यांनी आपल्या मनोगतातून कर्नल पाटील यांचे कौतुक केले. विकास भांबुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,खान मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले दिलीप भिकुले यांनी आभार मानले. शिंदे मॅडम यांनी कर्नल पाटील यांचा परिचय करून दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसीन शेख, सुनील बाथम, कमलेश गोडसे, मन्सूर शेख,अय्युब खान आदींनी परिश्रम घेतले.
