Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

‘शिवतांडव’ नृत्य सादरीकरणाने भारावली मने !

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सुकृती कथक डान्स अॅकॅडमी (पुणे) यांच्या ‘शिवतांडव’ या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणाने शुक्रवारी सायंकाळी रसिकांची मने जिंकली आणि रोमांच उभे केले!१० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमांत नटराज शिवशंकराच्या सात तांडव नृत्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन मनीषा अभय यांचे होते.संगीत चिन्मय कोल्हटकर,अमोद कुलकर्णी यांचे होते.मनीषा अभय,सिध्दी अभय,कल्याणी कुलकर्णी,श्रध्दा जोशी,चैत्रा गोडबोले,सई जाधव,विनया महेश,सुहानी,गार्गी,साना,पूर्वा सहभागी झाले.मधुरा ओक यांनी निवेदन केले.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०७ वा कार्यक्रम होता.गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.वंदना,ताल आणि अभिनय पूर्वार्धात सादर झाले.ताल या प्रकारातील संवाद हे नृत्य सादर करण्यात आले.संवाद म्हणजे नृत्य कलाकार आणि तबला यांमधील संवाद होता.त्रिताल राग परमेश्वरीमधे सादर करण्यात आला.अभिनय या प्रकारातील ‘कृष्ण नीरतत्’ही पं.बीरजू महाराजांची रचना सादर करण्यात आली.उत्तरार्धमध्ये शिवतांडवचे अनंत तांडव,गौरी-उमा तांडव,कालिका तांडव,संध्या तांडव,संहार तांडव हे उर्वरित नृत्यप्रकार सादर करण्यात आले.

कलाकारांचे सत्कार परांजपे विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका श्रीमती फिलोमीना गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन करण्यात आले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून प्रवेश दिला गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading