Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाला मिळतोय पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– बालगंधर्व येथे 12 डिसेंबर पर्यंत अनुभवता येणार ‘चित्र-शिल्प संवाद’

पुणे : राज्यातील नामवंत चित्रकार, शिल्पकार आणि काष्ठशिल्पकार यांचे प्रात्यक्षिक बघण्याची संधी, दिग्गज कलाकारांच्या पेंटिंग्ज, विविध कलाकृतीचे प्रदर्शन असलेल्या ‘चित्र-शिल्प संवाद’ या अनोख्या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा “चित्र-शिल्प संवाद” हा एक आगळा वेगळा बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू आहे. 12 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार्‍या या उपक्रमाचा आज तिसरा दिवस होता.

‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमात शुक्रवारी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध शिल्पकार प्रशांत देसाई यांनी ज्येष्ठ चित्रकार सुधीर लोणकर यांचे शिल्प तयार केले. तर दुपारच्या सत्रात प्रसिद्ध चित्रकार सुरभी गुळवेलकर यांनी दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर यांचे तर अझरुद्दीन इनामदार यांनी राजवर्धन हर्षवर्धन मानकर यांचे पोट्रेट रेखाटले. यामुळे आज या उपक्रमात युवा कलाकार आणि मॉडेल म्हणून ज्येष्ठ, युवा आणि बाल अशा तीन पिढ्यांचा संगम बघायला मिळाला. या प्रसंगी आयोजक दीपक मानकर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, दीपक थोपटे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, दत्ता सागरे, विवेक खटावकर, निलेश आर्टिस्ट, विनोद सातव, विनायक रासकर आदी उपस्थित होते. ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमात पुढील दोन दिवस दिगग्ज कलाकारांचे काम प्रत्यक्ष बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे तरी कलाप्रेमी पुणेकरांनी उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक दीपक मानकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading