fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

पुणे पालिकेतील बोगस इंजिनियर पदोन्नती घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई व्हावी -आपचा आरोप

पुणे : पुणे महानगरपालिकेतील बोगस इंजिनियर पदोन्नती घोटाळा संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे महापौर यांनी तातडीने या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा तुमचाही यात सहभाग आहे, ही शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप आम आदमी पार्टीचे पुणे प्रवक्ता डाँ.अभिजीत मोरे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला आहे.

मोरे म्हणाले, बोगस इंजिनियर पदोन्नती घोटाळ्याचे धागेदोरे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचल्यामुळे याचं गांभीर्य अजून जास्त वाढले आहे. दरम्यान या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चौकशीची मागणी केली आहे. परंतु महापौरांना केवळ एवढी मागणी करून स्वतःची जबाबदारी झटकता येणार नाही. अद्यापही या प्रकरणातील 18 बोगस इंजिनियरवर बडतर्फीची कारवाई झालेली नाही किंवा ही यादी रद्द ही केली गेलेली नाही आणि यातील 18 बोगस अभियंत्यांवर महानगरपालिकेने कोणतीही फौजदारी कारवाईही केलेली नाही. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायाला हवी.

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.  तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील आम आदमी पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज आम आदमी पक्षाच्या वतीने सदर पदोन्नती प्रक्रिया वर लिखित आक्षेप महानगरपालिकेमध्ये सादर करण्यात आले आहेत.

आम आदमी पक्षाच्या या आहेत मागण्या –

– या यादीवर आणि प्रक्रियेवर वर व्यक्त केलेल्या आक्षेपांची गंभीर नोंद घेऊन शासकीय लाभ मिळवण्यासाठी AICTE ची मान्यता नसलेल्या जेआरएन राजस्थान विद्यापीठ येथील अभियंता पदविका प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 18 मनपा कर्मचाऱ्यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी तातडीने बडतर्फ करावे आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

– या प्रक्रियेत लबाडी, बोगस प्रमाणपत्रांचे सादरीकरण व त्यास मान्यता, प्रचंड घोळ, अपारदर्शकता, मनपाची व नागरिकांची फसवणूक इ. झालेली असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया व यादी रद्द करावी.

– या सगळ्या रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करावी.

– नव्याने पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी आणि अर्ज मागवावेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading