आक्रमण-बचावाच्या स्वातंत्र्यास नियमां’चे बंधन व त्यातून गुणांचे प्रदर्शन, हेच् खेळा’चे धोरण – गोपाळदादा तिवारी
पुणे : कोणत्याही क्रीडा प्रकारात ‘आक्रमण व बचावाच्या’ स्वातंत्र्यास ‘नियमांचे बंधन असते व त्यातून गुणांचे प्रदर्शन” हेच खेळा’चे धोरण… ही सरळ साधी व्याख्या ‘संविधानाच्या बंधनात’ लोकशाही प्रणीत भारतात राज्य-कर्त्यांकडून देखील अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी केले.
राजीव गांधी स्मारक समिती तर्फे पुणे ॲमच्युअर बॅाक्सिंग संघटनेच्या सहकार्य काँग्रेस व युपीए अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदीवसाचे औचित्याने जिल्हास्तरीय बॅाक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सणस स्पोर्ट ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा स्तरीय बॅाक्सिंग स्पर्धांचे अध्यक्ष व काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे होते.
कोरोना मुळे मोठा कालावधी मुलांना प्रत्यक्ष खेळण्या पासुन वंचित रहावे लागले होते. परंतू अगदी योग्य वेळीच ‘राजीव गांधी स्मारक समितीने’या स्पर्धा भरवून क्रीडा क्षेत्रास ऊर्जा दिल्या बद्दल संयोजन संस्थेचे रमेश बागवे यांनी ऊदघाटन प्रसंगी अभिनंदन केले.
या स्पर्धेत, शहरातील विविध क्लब चे बाल, किशोर व तरूण असे ६० तरूण सहभागी झाले होते.. पैकी १० मुलींच्या व १९ मुलांच्या जोड्या (बाऊट्स) मधे स्पर्धा झाली. या स्पर्धांचे सुत्र संचालन व पुणे मॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन चे सेक्रेटरी मदन वाणी यांनी सांगितले.
या प्रसंगी पुणे शहर महीला काँग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, अविनाश बागवे, मृणालिनी वाणी (महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), सिने व टीव्ही अभिनेता शिवराज वाळवेकर, शिवसेना युवा सेनेचे प्रमुख सुरज लोखंडे, धनंजय जाधव ( माजी नगरसेवक व प्रवक्ता भा.ज.प.), वसंतराव खाटपे (सामाजिक कार्यकर्ते), आण्ण गोसावी, सुरेश आप्पा जैन (विद्यार्थी सहाय्यक समिती), ऊल्हास शिंदे इ उपस्थित होते. राजीव गांधी स्मारक समितीचे जेष्ठ सदस्य सर्वश्री सुर्यकांत मारणे, रामचंद्र शेडगे, भोला शेठ वांजळे, नितीन पायगुडे, ॲड सचिन अडसुळ, संजय अभंग, महेश अंबिके, पै शंकरराव शिर्के, अशोक काळे, आशिश गुंजाळ, सुरेश ऊकीरंडे, योगेश भोकरे इ व स्पर्धा नियोजन समिती सदस्य श्री विकास दवे, अतुल कोर्डे, आण्णा झवेरी, प्रविण डाकणे, रमाकांत शिंदे, सुधाकर इंगळे, दत्ता दळवी, इ हस्ते बक्षीसे व मेडल्स देण्यात आली. आभार प्रदर्शन भोला शेठ वांजळे यांनी केले..!
