महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पुणे : काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यावरून झालेल्या वादानंतर जिल्हा न्यायालयाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आज न्यायालयाने संबंधित कामाला स्थगिती दिली असून एक महिन्यात तपासणी अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत. देविदास ओव्हाळ यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी पुणे प्रशासनाने दिले होते. या कारवाईवरुन मोठा वाद झाला होता. परिसरातील नागरिकांनी जागा सोडून जावे आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप सादर प्रकरणातील फिर्यादीत करण्यात आला आहे.
यामागे कोणतं षडयंत्र आहे का हे तपासलं पाहिजे – महापौर मुरलीधर मोहोळ
ज्या स्स्त्याचा उल्लेख या फिर्यादीत आहे. त्या रस्त्यामध्ये एक गणपती मंदिर आणि बौद्ध विहार होते. ते पडल्यानंतर मी स्वखर्चानं बांधून दिले आहे. मागील एक वर्षात मी या वस्तीत देखील गेलो नाही. महापालिकेने रीतसर प्रक्रिया पुर्ण करून या भागातील सार्वजनिक शौचालय पाडले आहे. 3 वर्ष हा विषय सुरू असताना नेमका आताच हा विषय कसा काय पुढं येतो यामागे कोणतं षडयंत्र आहे का हे तपासलं पाहिजे ?असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
