30 व्या सीनियर राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
पुणे: भोपाळ मध्यप्रदेश येथे दि. ५ ते १० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३० व्या सिनियर राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. मेरठ उत्तरप्रदेश येथे महाराष्ट्र संघाचे सराव प्रशिक्षण सुरू असताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी सराव प्रशिक्षणाची पाहणी करून खेळाडूंना मार्गदर्शन केले.
यावेळी वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र सिंग बाजवा, सीईओ सुहेल अहमद आणि ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सोपान कटके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे महाराष्ट्र वुशू संघाला येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त होईल अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. या स्पर्धेमध्ये अंदाजे एकूण १२०० खेळाडूंची व ४२ संघाची उपस्थिती आहे. दीपक बिसेन हे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून तर महेश इंदापूरे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र वुशू संघ पुढील प्रमाणे :-
ताउलू
अथर्व मोडक (ताईजिक्वान)
राजमल्हार व्हटकर (ताईजिक्वान)
कुणाल कोद्रे ( झिंगिकान)
निखिल जाधव (हाँकोन)
प्रफुल गजभिये (झिंगिक्वान)
चेतन सोनावणे (शावलिंक्वान)
वैभव पाटील (वींग चून )
श्रावणी कटके((ताईजिक्वान)
तृप्ती चांडवडकर (चांन क्वान )
कल्याणी जोशी ( ताईजिक्वान)
खुशी तेलकर (चांन क्वान)
स्नेहल बडस्कर (शावलिंक्वान)
रिजवान पठाण ( हाँकोन)
नयन निर्मल (नांक्वान)
सानसू
अदनान मुक्री (५२ किलो )
ओमकार पवार (५६ किलो )
संकेत पाटील (६० किलो )
ऋषिकेश मालोरे (६५ किलो )
प्रथमेश शेट्टी (७० किलो )
निर्मल शेटे (८० किलो )
भक्ती चव्हाण (४८ किलो)
ऋतुजा सुर्वे (६० किलो)
अश्विनी बोत्रे (६५ किलो)
