Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

घटक पक्षांबरोबर एकत्र निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेस पक्ष तयार आहे – पृथ्वीराज चव्हाण

पुणे:दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व शरद पवार यांची भेट झाली. युपीए मधील घटक पक्ष हे येण्याऱ्या निवडणूकित एकत्र लढणार का ह्याची चर्चा आहे त्या वर यूपीए मधील घटक पक्षांबरोबर जर एकत्र निवडणूक लढणार असतील तर काँग्रेस पक्ष तयार आहे. असे काँग्रेसचे नेते व माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

यूपीए मधील घटक पक्षांबरोबर जर एकत्र निवडणूक लढणार असतील भाजप नक्कीच  पराभूत होईल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ममता दिदी या देशाच्या नेत्या आहेत बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांचा विचार मांडले पण काँग्रेस ने त्यांच्या विचार स्वीकारावे असा प्रश्न उद्भभवत नाही. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
ममता मोदींना एकप्रकारे मदत करतायत. त्या भाजपच्या आधीही सहकारी होत्या. भाजप विरोधी आघाडीला त्या छेद देण्याचे काम करतायत. अशीही टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी ममता बॅनर्जी वर केली. महात्वाकांक्षा असायला हरकत नाही. पण भाजप विरोधी आघाडी उभी रहायला हवी. नाशिकच्या संमेलनावरून जो वाद सुरू आहे त्या वर पणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, फडणवीसांनी सावरकरांच्या नावाने वेगळा कार्यक्रम सुरु करावा. नाशिकमधे जाऊन कुसुमाग्रजांचे नाव घ्यायचे नाही तर कुणाचे घ्यायचे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading