शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन वेळी भाजपा वकील आघाडीचे शक्ती प्रदर्शन
पुणे: आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन समारंभ माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले
या सोहळ्याला पुणे वकील आघाडीच्या वतीने शिवाजीनगर न्यायालयाकडून भाजपा कार्यालयाच्या दिशेने चालत रॕली काढून पुणे जिल्हाध्यक्ष वकील आघाडी ॲड. संजय सावंत पाटील, पुणे शहर अध्यक्ष वकील आघाडी ॲड. ईशानी जोशी यांच्या सह सर्व वकील आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी घोषणा देत जलौषात पोहचले….रॕलीचे नियोजन पुणे शहर वकिल आघाडीच्या वतीने ॲड. ईशानी जोशी व पुणे शहर वकील कमिटी यांनी केले,
यावेळी ॲड. निलेश निढाळकर, ॲड. एस.एस.आघाव सर, ॲड. आदित्य खांदवे पाटील, ॲड. श्रीराम कांबळे सर, ॲड. अनिल मिसाळ सर, ॲड मोहना गर्दे, ॲड. सचिन राणे सर, ॲड. जयश्री बिडकर, ॲड. निता जोशी, ॲड. अनिशा फनसलकर, ॲड. जयश्री चौधरी, ॲड.पाठक अभिषेक, ॲड. यश काळभोर, ॲड. रेणुका पाठक, तसेच पुणे शहर भा.ज.पा वकील आघाडीचे सर्व सन्मानित पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती पुणे जिल्हाध्यक्ष वकील आघाडी ॲड. संजय सावंत पाटील यांनी दिली.
