Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सिलेंडरसाठी वांचित आघाडीने चूल पेटवून केला निषेध

पुणे : घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात तसेच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अँड. अरविंद तायडे यांनी केले .

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव, अ‍ॅड. सर्वजित बनसोडे, युवा सदस्य विशाल गवळी, ज्येष्ठ नेते वसंत दादा साळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष (पूर्व) राजकुमार, पश्चिम अध्यक्ष संतोष लोखंडे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद तायडे, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी अध्यक्षा शारदाताई बनसोडे, महासचिव संजीवन कांबळे, युवा आघाडी अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे आणि अ‍ॅड. रेखाताई चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाचे विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चूल पेटवून चुलीवर पिठलं-भाकरी आणि ठेचा तयार करत शासनाचे लक्ष वेधले. “गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,” असा तीव्र संदेश या कृतीतून देण्यात आला.

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक स्वरूपात पिठलं-भाकरी व ठेचा यांची डिश देत सरकारने सर्वसामान्यांच्या अडचणींची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने तातडीने गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत, तसेच घरगुती सिलेंडरची नियमित आणि अखंड उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading