Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बारामती पोटनिवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार भावूक, मतदारांना भावनिक आवाहन

पुणे :  बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण केले. दोन महिन्यांपूर्वी आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याची वेदना व्यक्त करत त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली.
“दादा आज आपल्यात नाहीत, हे मला अजूनही मान्य होत नाही. त्यांचं जाणं ही केवळ माझ्या कुटुंबाची नव्हे, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची मोठी हानी आहे,” असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला. “बारामती म्हणजे दादांचा श्वास होता आणि त्यांचा अखेरचा श्वासही या मातीतच विसावला,” असे सांगताना त्या visibly भावूक झाल्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून तुमच्यासाठी उभी राहिले आहे. हा धीर मला बारामतीकरांकडूनच मिळाला.”
गेल्या तीन दशकांहून अधिक काळात बारामतीकरांनी अजित पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून दिल्याची आठवण करून देत त्यांनी मतदारांचे आभार मानले. “तुमचा पाठिंबा आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे,” असे त्या म्हणाल्या.
ही निवडणूक केवळ राजकीय लढत नसून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, “बारामतीकर आणि कार्यकर्त्यांपासून कधीही दूर राहणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading