Saturday, May 30, 2026
Latest NewsSports

मोल्डर्स संघाची सारडा स्टॅलियनवर मात

 

पुणे : गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करून मोल्डर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेत सारडा स्टॅलियन संघावर सात गडी राखून सहज मात केली. नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे.

या स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत मोल्डर्स संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या सारडा स्टॅलियन संघाला ११.५ षटकांत ९५ धावांत रोखले. सारडा संघाकडून मुकुल जाजू वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मुकुलने १६ चेंडूंत सहा चौकारांसह ३१ धावा केल्या. अमित बिहाणी, नीलेश राठी, संदीप काब्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. यानंतर मोल्डर्स संघाने विजयी लक्ष्य ११.५ षटकांत तीन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. प्रथमेश झंवरने २७ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. त्याला निलेश राठीची चांगली साथ मिळाली. निलेशने १३ चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह २१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मोल्डर्सने अखेरपर्यंत संयम राखून बाजी मारली. पहिल्या पराभवातून सावरून मोल्डर्सने हा विजय मिळवला.

यानंतर दुसऱ्या लढतीत साईज मास्टर स्मॅशर्स संघाने हाय-बाइट चॅलेंजर्स संघावर सात गडी राखून मात केली. हाय-बाइटने निर्धारित १२ षटकांत ५ बाद ९८ धावा केल्या. मास्टर्स स्मॅशर्स संघाने १०.२ षटकांतच तीन गडींच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य साध्य केले. तिसऱ्या लढतीत प्ररव पँथर्स संघाने स्मॅशर योद्धाज संघावर ३१ धावांनी मात केली.

धावफलक : सारडा स्टॅलियन – ११.५ षटकांत सर्व बाद ९५ (मुकुल जाजू ३१,यश लढ्ढा २७, मधुसुदन कलंत्री १७, अमित बिहानी ३-०-२८-२, प्रथमेश झंवर २-०-१४-१, निलेश राठी ३-०-१७-२, संदीप काब्रा १.५-०-६-२) पराभूत वि. मोल्डर्स – ११.५ षटकांत ३ बाद ९६ (अंकित लढ्ढा ११, निलेश राठी २१, प्रथमेश झंवर नाबाद ३९, सुमीत मुंद्रा १६, मधुसुदन कलंत्री ३-०-२४-१, अमित राठी ३-०-२०-२). मॅन आॅफ दि मॅच -प्रथमेश झंवर

हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ५ बाद ९८ (सर्वेश भट्टड ४३, सूरज लाहोटी १२, सुदर्शन हरकुट १२, हर्ष झंवर २-०-१४-१, नयन भन्साली ३-०-२८-१, प्रथमेश मालपाणी २-०-१८-१, अमर झंवर २-०-१४-१) पराभूत वि. साईज मास्टर स्मॅशर्स – १०.२ षटकांत ३ बाद १०० (गिरिराज मोहता ३७, अमर झवर २७, केदार बजाज नाबाद १७, सुदर्शन हरकुट २-०-१६-१, विशाल सोनी २-०-२२-१, कन्हैया लढ्ढा ३-०-२४-१). मॅन आॅफ दि मॅच – गिरिराज मोहता

प्रारव पँथर्स – १२ षटकांत ३ बाद १२६ (गोविंद राठी नाबाद ५३, हर्ष दरक २८, अंकित बजाज नाबाद २६, आकाश काब्रा ३-०-२३-१, हितेश मल ३-०-३१-१, अभय जाजू १-०-१३-१) वि. वि. स्मॅशर योद्धाज – १२ षटकांत ४ बाद ९५ (हितेश मल नाबाद ३५, अभय जाजू नाबाद ३५, हर्ष दरक ३-०-१८-२, धीरज मंत्री ३-०-२३-१, गोविंद राठी १-०-४-१). मॅन आॅफ दि मॅच – गोविंद राठी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading