Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

मुलांना सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमासाठी प्रोत्साहन द्यावे – मुकुंद पवार

 

पिंपरी : लहान मुलांना मोबाईल पासून दूर रहावे आणि आपली कला, संस्कृती समजून घ्यावी यासाठी त्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.

रामनवमी निमित्त मोशी, प्राधिकरण सेक्टर चार येथील केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला आयोजित करण्यात आली होती. तसेच ‘गोल्डन टेन डेज’ या उपक्रमात १० दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि. ४) श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय विहार सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तायडे, सचिव मुकुंद पवार, कार्यक्रम संयोजक सुविधा बोऱ्हाडे, सांस्कृतिक कमिटी अध्यक्ष सोनाली हरणे, लालचंद जाधव, अंबादास चौधरी, प्रकाश खोल्लम, मंगेश बोऱ्हाडे, गजानन शिंदे, राधाकृष्ण केदार, प्रीती गाडे, दीपक निंबार्ते, सौरभ जोगळेकर, मंगेश ओवाढकर, अमित शेरे, ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक मनोहर हरणे, अविनाश पवार, रघुनाथ बिरदवडे, दिपक धोंडी, ॲड. स्वाती पावडे आदी उपस्थित होते.

यावेळी रामलीला मध्ये सहभाग घेतलेल्या ३० बालगोपालांना व गोल्डन टेन डेज मध्ये सहभागी झालेल्या २० मुलांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
रामलीला मध्ये आर्या गुट्टे, कृपा खांडेकर, रुत्वी जोशी, प्रार्थना चतरला, हंसी पटेल, दुर्वा पाटील, सौम्या खोल्लम, निया गुट्टे, श्रुतिका गवळी, रिया कडपट्टी, ज्ञानेश्वरी बनसोडे, परी शिंदे, अविका, अद्वैत कुलकर्णी, धनिका धोंडी, श्री खांडेकर, राजवीर जाधव, अवनीश हांडे, प्रतम छत्रला, जोष्णिका बोयापती, त्रिशा जगताप, श्लोक बोऱ्हाडे, पार्थ शिंदे, दिया हरणे, प्रियन पटेल, आरव कुलकर्णी, स्वरा खांडेकर, शाशा पावडे आणि सहर्ष गवळी यांनी सहभाग घेतला होता. लेखन आणि नृत्य मार्गदर्शन सुविधा बोऱ्हाडे, वेशभूषा कृपा छत्राला आणि रिसील छत्राला यांनी केले.

गोल्डन टेन डेज मध्ये विविध स्पर्धेत देवांश खांडेकर हृदय गोहेल, खुशार्थ पटेल, वेद अरगडे, स्मित जयेश, मुदित बोरा, निधिश बोरा, देवांश आढळराव, आरुष जाधव, ध्वती मेघपारा, शारश गवळी, अवनी नरवडे, तक्ष पटेल, सात्विक भोपळे, यशश्री आमले, अवंती राऊत, आर्य जगताप, दिव्यांश हरणे, देबुदत्त चक्र यांनी बक्षीस मिळवले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading