पुण्यातील 90.6 टक्के गेटेड कम्युनिटीज 3 वर्षांत हरित पायाभूत सुविधा वाढवणार – मायगेट सर्वेक्षण
पुणे : हरित जीवनशैली हा केवळ परवलीचा शब्द राहिलेला नाही, असे मायगेटने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले असून या सर्वेक्षणानुसार पुण्यातील 90.6 टक्के गेटेड कम्युनिटीज पुढील 3 वर्षांत हरित पायाभूत सुविधा वाढवणार आहेत. मायगेट हे भारतातील सर्वात मोठे कम्युनिटी व्यवस्थापन अप असून रेसिडेंट वेल्फेयर असोसिएशनने (आरडब्ल्यूए) इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) चार्जिंग पायाभूत सुविधा, सौर उर्जा आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगप्रती नागरिकांची मानसिकता समजून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सुमारे 800 आरडब्ल्यूए सहभागी झाल्या होत्या व त्यातील 168 पुण्यातील होत्या. तीन मुद्द्यांपैकी ईव्हीला सर्वाधिक प्राधान्य असून त्यापाठोपाठ सौर उर्जेला पसंती आहे. दुसरीकडे तीनपैकी जवळपास एका कम्युनिटीने यापूर्वीच रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा स्थापन केलेली आहे.
या सर्वेक्षणानुसार पुण्यातील बहुतांश (90.3 टक्के) गेटेड कम्युनिटीज पुढील तीन वर्षांत ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा बसवण्याचे नियोजन करत आहेत. त्यापैकी 55.3 टक्के पुढील 12 महिन्यांत ही सुविधा सुरू करणार आहेत, तर 35 टक्के कम्युनिटीज पुढील 1 ते 3 वर्षांत ही सुविधा बसवणार आहेत.
हा उत्साह केवळ ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नाही. सौर पायाभूत सुविधांनाही आरडब्ल्यूएकडून प्राधान्य मिळत आहे. 71 टक्के कम्युनिटीजनी पुढील 3 वर्षांत सौर उर्जा पायाभूत सुविधा बसवणार असल्याचे सांगितले. मात्र, ईव्ही चार्जिंगच्या तुलनेत जास्त कम्युनिटीज 0-12 महिन्यांच्या कालमर्यादेला (56 टक्के) 1 ते 3 वर्षांच्या कालमर्यादेपेक्षा (21 टक्के) जास्त पसंती मिळत आहे. केवळ 14 टक्के कम्युनिटीजनी सौर उर्जा पायाभूत सुविधा बसवलेल्या आहेत.
गेटेड कम्युनिटीजमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा सुरू करण्यात रस दिसून येत आहे. 52 टक्के कम्युनिटीजनी यापूर्वीच ही सुविधा सुरू केली आहे. त्याशिवाय 32 टक्के कम्युनिटीज पुढील 12 महिन्यांत रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. 15 टक्के कम्युनिटीजनी अनुक्रमे 1-3 वर्षांत ही सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
सर्वेक्षणाविषयी मायगेटचे सीओओ आणि सह- संस्थापक अभिषेक कुमार म्हणाले, ‘गेटेड कम्युनिटीज मोठ्या प्रमाणावर हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे पाहणे उत्साहवर्धक आहे. मायगेटमध्ये आम्ही आमच्या कौशल्याच्या मदतीने कम्युनिटीजना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी उत्सुक असून ईव्ही क्षेत्रात यापूर्वीच आम्ही हे काम सुरू केले आहे.’
सर्वेक्षणात अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली- एनसीआर, हैद्राबाद, मुंबई आणि पुण्यातील गेटेड कम्युनिटीजचा सहभागी झाल्या होत्या आणि एकंदर निष्कर्षानुसार हरित सुविधांविषयीची उत्सुकता देशपातळीवर दिसून येत आहे. 73 टक्के गेटेड कम्युनिटीजनी नजीकच्या काळात (0-3 वर्ष) प्रमुख हरित पायाभूत सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितले, तर 0.6 टक्के कम्युनिटीजनी या तिन्ही सुविधा सुरू केलेल्या आहेत.
देशभरातील 75.4 टक्के गेटेड कम्युनिटीज पुढील 3 वर्षांत ईव्ही बसवण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे पुढील 3 वर्षांत सौर उर्जा सुविधा सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्यांचे प्रमाणही मोठे म्हणजेच 75.2 टक्के आहे. जवळपास 53 टक्के कम्युनिटीजनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू केले असून पायाभूत सुविधा अद्यावत करण्यात त्याला प्रथम प्राधान्य मिळत आहे. अंदाजे 38.9 टक्के गेटेड कम्युनिटीज पिढील 3 वर्षांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविदा सुरू करणार आहेत. मुंबई (78 टक्के गेटेड कम्युनिटीज) पुढील 3 वर्षांत ईव्ही पायाभूत सुविधांच्या उभारणीसह आघाडीवर असून सौर उर्जेच्या बाबतीत पुणे (76.3 टक्के) आघाडीवर आहे.
