आता कू वर स्नॅपडीलशी करा थेट संवाद!
आघाडीचा इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेला स्नॅपडील, नुकताच कू वर दाखल झाला आहे. आता स्नॅपडील मेड-इन-इंडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कू (Koo) ॲपवर भारतातील लाखो यूजर्सशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधणार आहे.
भारतातील शहरातील वापरकर्त्यांना सेल, नवीन डिल्स तसेच ऑफर्सविषयी त्यांच्या भाषेतून थेट माहिती कळवण्यासाठी स्नॅपडील कू वरच्या बहुभाषा वैशिष्टयांचा प्रभावी वापर करेल. आपल्या मातृभाषेमध्ये व्यक्त होण्यासाठी कू ॲप सध्या हिंदी, बंगाली, आसामी, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती आणि इंग्रजी अशा 9 भाषांमध्ये सुविधा उपलब्ध करून देते आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर दीड कोटीहून अधिक यूजर्स सक्रीय आहेत.
स्नॅपडीलचे ब्रँड मार्केटिंग डायरेक्टर सौम्यदीप चॅटर्जी म्हणाले, देशातील दुर्गम भागांतल्या लोकांपर्यंत पोचून त्यांच्याशी मातृभाषेत संवाद साधणे मोबाईल इंटरनेटमुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे बहुभाषिक मजकूर तयार करण्याच्या कामी गुंतवणुक करणे अतिशय महत्त्वाचे बनलेय. सारखा प्लॅटफॉर्म आम्हाला
स्थानिक भाषांतील संवादासाठी व्यापक मदत करेल. स्नॅपडील चे स्वागत करताना ॲपचे को-फाउंडर मयंक बिडवाटका म्हणाले ;एक लोकप्रिय आणि मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आमच्याशी जोडला जातोय याचा आम्हाला आनंद होतो आहे. भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याची
संधी देते. ऑटो- ट्रान्सलेशन हे आमचे खास वैशिष्ट्य भाषेचे सर्व अडथळे दूर करून यूजर्सना एकमेकांशी जोडते. आम्हाला खात्री आहे, की या वैशिष्टयांमुळे स्नॅपडीलच्या युजर्सपर्यंत मोठ्या प्रमाणांत यूजर्स त्यांचे प्रोमोशन्स पोहचवू शकेल. काय आहे कू? ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, विविध क्षेत्रातील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी एक मंच मिळवून देतो.
