Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

कोरोना काळातील देवदूतांचा मनजित सिंग विरदी फाउंडेशनतर्फे खास सन्मान..

‌‘अंतिम’ चित्रपटाच्या खास शो चे आयोजन…

पुणे: कोरोना काळात अहोरात्र झटणा-या योद्ध्यांचा सन्मान एका अनोख्या पद्धतीने करण्यात आला. राज्यातील चित्रपट गृहे नुकतीच सर्वसामान्यपणे सुरु होत असताना या योद्ध्यांना हक्काचा विरंगुळा मिळावा, आपल्या परिवाराबरोबर चित्रपट रसग्रहणाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने मनजित सिंग विरदी फाउंडेशनच्या वतीने ‘अंतिम’ या चित्रपटाच्या खास शो चे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात रुणांवर उपचार करणाऱ्या नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, गरजूंना अन्नपुरवठा करणाऱ्या देवदूतांचा सन्मान यावेळी करण्यात आला. फाउंडेशनतर्फे अशा सुमारे ४५० जणांसाठी बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे ‘अंतिम’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपटावेळी स्वयंसेवकांच्यावतीने सर्वांना आपुलकीने पॉपकॉर्न तसेच कॉफी देण्यात आली.

यावेळी फाउंडेशनचे प्रमुख मनजित सिंग, माजी आ. मोहन जोशी, माजी आ. रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक साईनाथ बाबर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक बाबू वागस्कर, डॉ. मिलिंद भोई, बंडगार्डन पोलीस निरिक्षक यशवंत गवारी, कोंढवा पोलीस निरिक्षक सरदार पाटील, लष्कर पोलीस स्टेशन पोलिस निरिक्षक अशोक कदम, पुणे महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे, पोलिस नाईक अनिल श्रीमंत माने, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोरोना योध्यांचा प्रातिनिधिक सन्मान यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading