यंदाचे 12 वे गंगुताई पटवर्धन स्मृती व्याख्यान 28 नोव्हेंबर ला पुण्यात

पुणे : मार्च 2020 पासून आतापर्यंत कोरोनाच्या जागतिक महामारी संदर्भात असलेल्या निर्बंधांमुळे आमच्या मंडळाचे कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाहीत. परंतु यंदा शासकीय नियमानुसार 12 वे गंगुताई पटवर्धन स्मृती व्याख्यान निवारा वृद्धाश्रम पत्रकार भवन येथे 28 नोव्हेंबर सकाळी 11.15ते दुपारी 1.30 होणार आहे, अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत बडोदे मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय थोरात यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला बडोदे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अतुल शहा, अजीत केसकर, राजेंद्र माहुलकर उपस्थित होते.
विजय थोरात म्हणाले, 25 ऑक्टोबर 2009 संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी 24-10-2019 साली हीरक महोत्सव अत्यंत यशस्वीपणे पार पडला. श्रीमंत राजमाता विजयाराजे गायकवाड यादेखील या कार्यक्रमास आल्या होत्या, असेही विजय थोरात म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: