मुठा नदी पात्राची ‘वहन क्षमता’ वाढवण्याचे मनपा चे कोणतेही प्रयत्न नाहीत – गोपाळदादा तिवारी

पुणे : पुणे मेट्रो चे काम जोरात सुरू असून पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रातून (लकडी पूल ते नवा पूल) जाणाऱ्यी “मेट्रो लाईन”चे सिमेंट खांब, स्टेशन्स चे ईन्फ्रास्ट्रक्चर इ नदी पात्रातच ऊभे रहात असलेमुळेच “मुठानदी पुर पातळी प्रमाण रेषा” बाधीत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाधीत ‘पुर पातळी प्रमाण रेषा’ भरून काढण्यासाठी पात्राची खोली इ वाढवून, अतिक्रमणे काढून ‘नदी पात्रातील पाण्याची वहन क्षमता’ वाढवण्याचे पुणे मनपा वा पुणे मेट्रो चे कोणतेही प्रयत्न दिसत नाहीत.. ऊलट पात्रात अतिक्रमणे, बांधकामे वाढत असून लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने डोळ्यांवर झापडे लावल्याचेच दिसते. त्या मुळे येणाऱ्या पावसाळ्यात अतिवृष्टी इ झाल्यास धरणातील पाण्याचा अधिक विसर्ग झाल्यास मध्यवस्तीतील नागरीकांवर पुराच्या धोक्याची टांगती तलवार सदैव रहाणार आहे.. त्यामुळे “लकडी पूल ते नवा पूल” पात्रातील मेट्रो बांधकामांमुळे “बाधीत होणारी पाण्याची-वहन क्षमता” व त्यायोगे ऊदभवणारा संभाव्य धोका कशा प्रकारे कमी करणार या विषयी काय ऊपाय योजना आखल्या आहेत..(?) या विषयी माहीती मिळण्या करीता राजीव गांधी स्मारक समिती अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी पुणे मनपा आयुक्तांना पत्रा द्वारे विचारले आहे…!

Leave a Reply

%d bloggers like this: