अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जनजाती गौरव यात्रेचे आयोजन

पिंपरी :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जनजाती गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेचे सुरुवात पिंपरी चिंचवड पासून झाली. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते यात्रेचे उदघाटन झाले.
जनजाती समाज्याचा उत्कर्ष व जनजाती क्रांतिकारक यांचा गौरव तसेच अडगळीत पडलेल्या समाज्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा पूर्ण पुणे विभागात फिरणार आहे. या वेळी पिंपरी चिंचवड मधील नागरिक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: