अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याबद्दल जनशक्तीचा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मुंबई: राज्यातील एस.टी. कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर असून गेल्या पंधरा दिवसापासून ते आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. मात्र याची कोणतीच दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली नसल्याने ‘जनशक्ती’च्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी बाहेर काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला असून या प्रकरणी त्यांना काल दि.23 नोव्हेंबर रोजी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे कार्यकर्ते बाबाराजे कोळेकर, रोहन नाईकनवरे, अमोल चव्हाण, अनिरुद्ध हिंगे, ओंकार शेलार यांनी काल दि. 23 नोव्हेंबर रोजी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी व एसटीच्या विलीनीकरणासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर ३५३, १४१, १४३, १४५, १८८, १४९, १३५, ३७(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता
मॅजिस्ट्रेट ( दंडाधिकारी) किल्ला कोर्ट यांनी एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आंदोलक आरोपीतर्फे ॲड सदानंद गुणवंत सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. विशाल जाधव, ॲड.गुरुनाथ आईर, ॲड . प्रदिप झा यांनी काम पाहिले. अशी माहिती जनशक्ती चे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: