शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजली सभेचे शनिवारी आयोजन

पुणे : विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, इतिहास विषयक अशा सुमारे १२५ हून अधिक संस्था संघटनांच्या वतीने शिवशाहीरा वंदन तुजला या बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे ही सभा होणार आहे.महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त जगदीश कदम या श्रद्धांजली सभेचे निमंत्रक अणि आयोजक आहेत.
शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घराघरात पोचले. पुण्यातील भव्य शिवसृष्टीचा संकल्प त्यांनी सोडला.
बाबासाहेबांच्या अनेक आठवणी सर्वांच्या हृदयात आहेत. त्यांना १२५ हून अधिक विविध क्षेत्रातील संस्था संघटनांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.यावेळी खासदार छ. उदयनराजे भोसले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,रा.स्व. संघ प्रांत संघचालक नाना जाधव, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक अणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: