वांजळवाडी ग्रामस्थांचे सातबारा नोंदीसाठी सिंचन भवन येथे बेमुदत वास्तव्य आंदोलन

पुणे: पानशेत धरण प्रकल्पग्रस्त 1960 साली सरकारने मौजे वांजळवाडी ग्रामस्थांना नांदोशी सणसवाडी येथे गावठाणा साठी जागा दिली. सर्वांसाठी रस्ते, विहीर,वीज, पाणी ,समाज मंदिर अशा सुविधा सुद्धा दिल्या. आज तीन पिढ्या तिथं वास्तव्य करत आहेत . परंतु आजही ति जागा आमच्या नावावर नाही. त्यामुळे मौजे वांजळवाडी ग्रामस्थांनी आज पुण्यात सिंचन भवन येथे अबालवृद्ध लहान मुले पशुधन यांच्यासह वास्तव्यास आले आहेत .

मौजे वांजळवाडी ग्रामस्थांचे सातबारा नोंदीसाठी सिंचन भवन येथे बेमुदत वास्तव्य आंदोलन सुरू केले असून. मौजे वांजळवाडी ग्रामस्थांनी आंदोलनाच्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. या आंदोलनाला ग्राम बचाव समिती चे सदस्य महेश गायकवाड, रमेश जागडे, उल्हास जागडे, माऊली ठाकर शिवाजी पिसाळ ,गजानन बिरामणे ांजळवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: