रिगालिया मिस्टर, मिस अँड मिसेस इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घोषणा

पुणे- रिगालिया इवेंट्स या संस्थे द्वारे ग्लॅमर च्या दुनियेत येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थेचे संचालक सौरभ मालू आणि साहिल भानगिरे यांनी येत्या नवीन वर्षात रिगालिया मिस्टर, मिस अँड मिसेस इंडिया 2022 या राष्ट्रीय स्तरावरील संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ( Announcement of Regalia Mr., Miss and Mrs. India national level competition)  मिस्टर आणि मिस गटामधे १६ ते २५ हा वयोगट तर मिसेस गटा मधे २५ च्या पुढे ही वयोमर्यादा ठेवण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरून इच्छुकांना स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक सौरभ मालू, साहिल भानगिरे आणि प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक चैतन्य गोखले ( Fashion show director Chaitanya Gokhale) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून या मधून निवड झालेल्या स्पर्धकांना चार दिवसांचे खास प्रशिक्षण चैतन्य गोखले देणार आहेत. या मधे स्पर्धेच्या दृष्टीने सर्व तयारी करून घेतली जाणार असून स्पर्धकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यशाळेचा समावेश असल्यामुळे हे प्रशिक्षण फक्त स्पर्धे पुरते मर्यादित न राहता स्पर्धकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गोखले यांनी सांगितले.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन घेतली जाणार असून अंतिम फेरी जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. आमच्या संस्थे तर्फे फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांना तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची संधी तसेच या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचे आमचे ध्येय असल्याचे मालू आणि भानगिरे यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होण्या करिता ८६२३८७१६२० येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

%d bloggers like this: