आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पिंपरी : आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका सलून चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. चिखली येथील धर्मराजनगरमध्ये काल (दि.२४ नोव्हेंबर) रात्री ८.००.वा.च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालकाला अटक केली आहे.
मोहंमद शेबू मोहंमद हनीफ सलमानी (रा. धर्मराजनगर, चिखली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आठ वर्षीय मुलगी तिच्या आजीसोबत डोक्याचे केस कापण्याकरिता थ्री स्टार नावाच्या सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी मोहंमद शेबू मोहंमद हनीफ सलमानी याने तिचे केस कटिंग करीत असताना तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत आरोपीवर चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उप निरीक्षक डी. एस. मुंडकर करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: