मोफत ‘आधार-पॅनकार्ड’ अभियानाला महर्षीनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मोफत आधार कार्ड, पॅनकार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात ५३४ नागरिकांनी आधारकार्डची दुरुस्ती करून घेतली, तर ५६ लहान मुलांची नवीन आधारकार्ड नोंदणी झाली. ८७ नागरिकांनी पॅनकार्ड दुरुस्ती, तर ९६ नागरिकांनी नवीन पॅनकार्ड काढले.
यासोबतच घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात ७८० नागरिकांनी सहभाग नोंदवला. महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात अभियान पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेतून पुष्कर प्रसाद आबनावे यांनी परिसरातील ५५१ विधवा व गरजू महिलांना महिनाभर पुरेल, एवढे धान्य व गृहपयोगी साहित्याच्या संचाचे वाटप करण्यात आले.
पुष्कर आबनावे म्हणाले, “नागरिकांना कागदपत्रे काढणे सोयीचे व्हावे, यासाठी परिसरात विविध अभियानाचे आयोजन केले जात आहे. या अभियानांना युवक, महिला, पुरुष, अबालवृद्ध अशा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरजू कुटुंबाना आधार देण्याच्या उद्देशाने धान्य-साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.”

Leave a Reply

%d bloggers like this: