धुळे-चाळीसगाव रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी अभाविपचे धुळे स्टेशन मास्टर यांना निवेदन…

धुळे : देशभरात व संपूर्ण महाराष्ट्रात गेली दोन वर्ष कोरोनाने धुमाकूळ घातलेला होता. परंतु सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात,देशभरात कोरोना चे रुग्ण हळूहळू कमी होत आहेत, आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध शासकीय सेवा सुरळीतपणे चालू झालेले आहेत आणि काही चालू होत आहेत त्यात प्रामुख्याने देशभरातील रेल्वे सेवादेखील सुरळीत सुरू झालेली आहे,परंतु अद्यापही धुळे-चाळीसगाव रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. महाराष्ट्रभरात एसटीचा संप सुरू असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे,याच अनुषंगाने अभाविपच्या शिष्टमंडळाने धुळे रेल्वे स्थानकातील रेल्वे मास्टर यांची भेट घेऊन धुळे-चाळीसगाव रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी या आशयाचे पत्र दिले.
यावेळी अभाविपचे धुळे शहर मंत्री भावेश भदाने सहमंत्री चेतन अहिरराव, उदय महाजन निलेश सूर्यवंशी,मोहित मराठे, योगेश कोल्लेवाल,नयन येवले, कांतीलाल सूळ,ओमकार मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: