पुण्याच्या २ वर्षाच्या माहीर शाहचा  इंडियन एक्सलेन्सी  अॅवार्डने गौरव

पुणे : पुण्याच्या माहीर दर्शन शाह याला  इंडियन बुक आॅफ  रेकाॅर्डचे इंडियन एक्सलेन्सी आॅफ अॅवार्ड प्राप्त झाले आहे. माहीर हा २ वर्षे १० महिन्याचा असून इतक्या कमी वयात अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक गोष्टी लक्षात ठेवून सांगतो. त्याच्या या बुद्धीमत्तेचा सन्मान करुन त्याला इंडियन बुक आॅफ  रेकाॅर्डचे इंडियन एक्सलेन्सी आॅफ  अॅवार्ड देऊन गौरव करण्यात आला.

२९ राज्ये ओळखणे, ७ खंड सांगणे, जगातील आश्चर्य सांगणे, विविध २५ देशांचे ध्वज ओळखणे, ३५ कारचे लोगो ओळखणे, ४० प्राणी, १० पक्षी सांगणे, २१ प्रसिद्ध व्यक्तिमत्व ओळखणे, २१ फळे आणि भाज्या सांगणे, ५ भौमितीक आकृत्या सांगणे आदी गोष्टी सहजपणे सांगत माहीर सर्वाना आश्चर्यचकीत करतो. ईतक्या लहान वयात एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून त्या अचूकपणे सांगणाऱ्या चिमुकल्या माहीरची इंडियन बुक आॅफ  रेकाॅर्डचे इंडियन एक्सलेन्सी आॅफ रेकाॅर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. माहीर शाह हा पुण्याचा राहणारा असून त्याची आई गृहीणी आहे, आणि त्याचे वडील व्यवसाय करतात.

लॉकडाऊनच्या काळात बाहेर  खेळण्यासाठी जाता येत नसल्याने बराच वेळ घरीच खेळावे लागत होते. त्यावेळी लक्षात आले की, माहिरला एखादी गोष्ट सांगितली ती त्याच्या व्यवस्थित लक्षात राहते.  त्यामुळे आम्ही नवनवीन गोष्टी त्याला सांगण्यास सुरुवात केली. त्याची दखल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे, असे  माहिर च्या पालकांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: