आदित्य जनसेवा रथाद्वारे आरोग्य सेवेचा जागर..

पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे नुकतेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील तब्बल 20 हून अधिक नामांकीत खाजगी आणि शासकीय रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना जिल्हाधिकारी अविनाथ बलकवडे यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी अंतर्गत आदित्य जनसेवा रथ भाग – 2 च्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिरंगुट येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये भव्य आरोग्य तपासणी व विनामुल्य शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. मणक्याचे आजार, अस्थमा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेहसह इतर आजारांसह, स्त्रीयांचे विविध आजारांविषयी उपस्थित तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर व युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे, पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जि.प.सदस्य कुलदीप  कोंडे, पुणे जिल्हा महिला संघटिका संगीता  पवळे, तालुकाप्रमुख सचिन खैरे या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या शिबिरात दिड हजारांहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला. विविध आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधउपचार करण्यात आले. नेत्र रोगाशी संबंधित रुग्णांना तपासणी झाल्यानंतर चष्म्ये वाटत करण्यात आले. विविध आजाराच्या ज्या रुग्णांना तपासणी नंतर शस्रक्रियेची गरज आहे अश्या जवळपास १५० रुग्णांच्या सर्व शस्रक्रिया मोफत लवकरच होणार असल्याचे शिबिराचे मुख्य आयोजक अविनाश बलकवडे यांनी सांगितले. या शिबिरांमध्ये विशेष उपस्थिती महिला व जेष्ठ नागरिकांची उल्लेखनिय होती.

या शिबिराचे मुख्य आयोजक युवसेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी संतोष तोंडे, नागेश साखरे, तालुका आधिकारी राम गवारे, दत्ता झोरे, तालुका संघटक संकेत दळवी यांनी शिबीर संपन्न करण्यात योगदान दिले. यावेळी उपस्थितांमध्ये उपजिल्हाप्रमुख जिल्हा वैद्यकीय कक्षाचे राजाभाऊ भिलारे, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, म्हाडाच्या संचालिका स्वातीताई ढमाले, आमोल पांगारे, कैलास मारणे, ज्ञानेश्वर डफळ आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील २० हॉस्पिटलच्या सहभागातून प्रामुख्याने नेत्ररोग, हृदययातील छिद्र, अँन्जीओप्लास्टी, हृदयरोग, कर्करोग, केमोथेरपी, मुत्रविकार व शस्त्रक्रिया, किडनी विकार व प्रत्यरोपण, मणक्याचे आजार, अस्थमा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, हाडंच्या ठराविक शस्त्रक्रिया, जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, मेंदूविकार व शस्त्रक्रिया, कान -नाक -घसा वर उपचार, फाटलेले टाळू व ओठांवरीन शस्त्रक्रिया, गुडघे प्रत्यरोपण, रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्त शुक्रा, इसीजी,सर्व प्रकारच्या तपासण्या व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी -चाचणी, औषध उपचार आणि मोफत शस्रक्रियांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: