सोहा अली खान ने सांगितले श्वसन आरोग्य बळकट करण्यासाठी फायदेशीर लहान उपायांचे महत्व

पुणे: पावसाळा संपल्यानंतर सुरु होणारा हिवाळा वातावरणात पर्यावरणीय बदल घडवून आणतात . नोव्हेंबर महिन्यात आकाश निरभ्र असते पण बदलणारा ऋतु आपल्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन येतो , जसे सर्दी आणि खोकला. या साठी  आवश्यक काळजी घेणे जरुरी आहे ज्यामुळे आपले श्वसन आरोग्य आणि निरोगीपणा टिकून राहील  आरोग्याबाबत जागरुक आई, शाही पतौडी कुटुंबातील सोहा अली खान, रोजची दिनचर्या आणि पथ्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रियपणे सांगत असते. सोहा नेहमीच पारंपारिक घटकांचे फायदे वापरून आणि योगाभ्यास करून पारंपारिक घरगुती उपचारांवर विश्वास ठेवते. या महिन्यात सोहा आपली लहान मुलगी इनायासोबत सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटतांना आणि गरम कॉफीसह तिच्या दर्जेदार वाचनाचा आनंद घेताना दिसते, पण त्याच बरोबर सोहा अली खान श्वसन आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे समजते कारण याच काळात खोकला आणि सर्दीची लक्षणे वारंवार दिसतात

तिच्या आरोग्याविषयी अधिक माहिती देताना सोहा म्हणते, “नोव्हेंबर हा एक अवघड महिना असतो जेव्हा बदलत्या हवामानाचा अंदाज बांधता येत नाही. मी सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेत असतांना मला माझ्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल सतत काळजी वाटते. पण एक गोष्ट जी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची ती म्हणजे आमच्या कुटुंबाचा आवडता, विक्स व्हेपोरब  आपल्या जीवनाचा एक मोठा भाग आहे, आणि पिढ्यानपिढ्या चालत आले आहे .

आपल्या शरीराला बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेताना सर्दीच्या सामान्य लक्षणांपासून विक्स व्हेपोरब मुळे आराम मिळण्यास मदत होते. या मोसमात आम्ही जास्त सावध असतो आणि वारंवार विक्स व्हेपोरब ची वाफ घेण्याचा प्रयत्न करतो.

सोहा अली खान पुढे म्हणते “वर्षाच्या या वेळी मला सर्दी होण्याची शक्यता असते कारण माझ्या शरीराला हवामानात अचानक झालेल्या बदलांशी जुळवून घेण्यास वेळ लागतो, परंतु ही अशी वेळ आहे जेव्हा घरी अनेक खास दिवस असतात ज्यात मला स्वतःचा आणि दर्जेदार कौटुंबिक वेळेचा आनंद घ्यायचा असतो. आजारी पडू नये म्हणून मी माझ्या आईच्या पुस्तकातून एक पान घेतले आहे. मी काही जुन्या घरगुती उपायांचे अनुसरण करते आहे, ज्यात विक्स व्हेपोरब सह वाफ घेणे समाविष्ट आहे कारण त्यात नीलगिरी, कापूर आणि मेन्थॉल सारखे नैसर्गिक घटक आहेत जे  खोकला आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम देतात.

Leave a Reply

%d bloggers like this: