थुकरटवाडी रितेश आणि जिनेलियाच्या स्वागताला सज्ज

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

येत्या आठवड्यात थुकरट वाडीत येणार आहे महाराष्ट्राचं लाडकं सिलेब्रिटी जोडपं रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात लयभारी या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती. त्यामुळे रितेश देशमुख हे चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावणारे सगळ्यात पहिले कलाकार आहेत. आता आठ वर्षांनी रितेश या मंचावर लयभारी आणि माउली चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्यांच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे. या दोघांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी कल्ला केला. लय भारी आणि माउली या चित्रपटांवर आधारित एक प्रहसन सादर केलं ज्याने रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसायला भाग पाडलं.
त्यामुळे हि धमाल मस्ती पाहायला विसरू नका – चला हवा येऊ द्या सोमवार ते बुधवार रात्री ९९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Leave a Reply

%d bloggers like this: