Pune – शिवसेनेचा प्रभाग 41 मधील स्नेहमेळावा संपन्न

पुणे: शिवसेनेचा प्रभाग 41 मधील स्नेहमेळावा पार पडला. स्नेहमेळाव्या मध्ये दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे आयोजन शिवसेनेचे प्रभाग 41 मधील अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केले होते.

या कार्यक्रमास समृद्धी जॅक जील स्कूल चे संस्थापक सुशील भोईटे, अनिल मेमाने, दिपक पालवे , अनिल देवकर ,भगवान पाटील प्रभात 41 मधील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. हा कार्यक्रम प्रभात 41 मधील अखिल साई नगर मित्र मंडळ सुखसागर नगर येथे पार पडला.

रमेश गायकवाड म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आमच्या पक्षाकडून दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असल्या तरी आम्ही हा कार्यक्रम पक्षातल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटता यावे म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे. असे रमेश गायकवाड म्हणाले.
सुशील भोईटे म्हणाले, एकमेकांशि फक्त फोनवर संवाद होतो. पण आज आम्ही सगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना भेटता यावे म्हणून, आम्ही दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सुशील भोईटे म्हणाले,

Leave a Reply

%d bloggers like this: