fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

‘मर्सिडीज-बेंझ’ची सर्वात शक्तीशाली ‘लक्झरी हॅच’ भारतात दाखल

पुणे : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही ‘जगातील सर्वात शक्तिशाली टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इंजिन सिरीज प्रॉडक्शन कार’ निर्माण करून आपल्या एएमजी गाड्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोलाची भर घातली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात वेगवान हॅचबॅक ठरली आहे.

 ड्रायव्हिंग परफॉर्मन्स‘ या एएमजी ब्रँडच्या ब्रीदवाक्याला मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीमुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. डिझाइनमधील नाविन्यतेसाठी आणि उच्च-श्रेणीच्या कामगिरीसाठी या गाडीने नवीन मानके घालून दिली आहेत. त्यामुळे या नवीन पिढीच्या कारमधून कल्पनातीत पातळीवरील वाहन गतिशीलता आणि स्पोर्टी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळू शकतो. 

मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची रिइन्फोर्स्ड बॉडी शेल’, शक्तिशाली इंजिन, ‘ड्रिफ्ट‘ ते रेस‘ असे ड्रायव्हिंगच्या पद्धतीचे प्रकार, रिवर्क्ड सस्पेंशन आणि विशिष्ट स्पोर्टी लूक यामुळे या लक्झरी कामगिरी विभागात अतुलनीय स्वरुपाचा ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी ही बहुप्रतिक्षित नवीन मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर केली. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार मर्सिडीज-बेंझच्या देशभरातील वितरकांकडे आणि मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असेल.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले, “देशातील सर्वात वेगवान हॅचबॅक असलेली नवीन मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही आमचा क्लासचा पोर्टफोलिओ मजबूत करीत आहोत. आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात डायनॅमिक अशी नवीन पिढीतील स्पोर्ट्स कार सादर करूनआम्ही आमच्या एकूण वाढीच्या धोरणात या विभागाचे महत्त्व अधिक दृढ करीत आहोत. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार एक उत्तम परफॉर्मन्स मशीन आहे. आमचे एएमजीचे ग्राहक आणि परफॉर्मन्स प्युरिस्ट’ तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही भारतातील विवेकी ग्राहकांसाठी आमच्या जागतिक पोर्टफोलिओमधील सर्वात इष्ट उत्पादने सादर करण्याची कटिबद्धता अधोरेखित केली आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading