एसटी कर्मचारी सांप – २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

मुंबई : एसटी महामंडळाने संपात सहभागी झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर आता रोजंदारी कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी झालेल्या अशा २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट कामावरून काढले आहे. त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एसटीच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबर काही रोजंदारीवर कर्मचारीही संपात सहभागी झाले होते.त्यामुळे एसटी महामंडळाने अशा २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना २४ तासाच्या आत कामावर हजर राहा नाहीतर तुमची सेवा समाप्त केली जाईल अशा आशयाची करणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानुसार अखेर काल २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच २९७ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आतापर्यंत २७७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान,कालच नाशिकच्या पेठ आगारातील चालक गहिनीनाथ अंबादास गायकवाड (२८) यांनी आपल्या सुलभनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.ते मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मानावळी येथील रहिवासी होते.त्यांच्या निधनाने कुटुंबासह कर्मचारी आणि अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: