फर्ग्युसन महाविद्यालयात अभयी मातृभु वीरांगना शोभायात्रेचे आयोजन

पुणे: पुण्यातील ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने भव्य दिव्य अशा अभयी मातृभु वीरांगना शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

झांसी की रानी, रानी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगराच्या डेक्कन नगरातील कार्यकर्त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत मर्दानी खेळ, नृत्य, पोवाडा, तसेच भाषणाचा देखील समावेश करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेल्या महाविद्यालयात या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

आजच्या या कार्यक्रमात ऍड.ईशानी जोशी यांनी झांसी की रानी या विषयात वक्तव्य करून व पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी अभाविप मांडणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यावेळेस अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, अभाविप पुणे सहमंत्री सोहम नारकर, शुभम बावचकर हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: